भारताचा इंग्लंडवर वनडेमधील दुसरा सर्वात मोठा विजय ; टीम इंडियाची मालिका विजयाची नोंद

Kolhapur news
By -

 

         


      अहमदाबाद :भारताने इंग्लंडला तिसऱ्या वनडे मालिकेत १४२ धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारताने या वनडे मालिकेत इंग्लंडवर निर्भेळ मालिका विजय नोंदवला. शुबमन गिलचे शतक, विराट कोहलीचं कमबॅक अर्धशतक, श्रेयस अय्यरची वादळी खेळी आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी हा मालिका विजय खूप महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय संघ खूप काळानंतर वनडे सामने खेळण्यासाठी उतरला होता, पण भारताच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी संघांची तयारी चांगली कशी आहे हे दाखवून दिले.

        चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी हा मालिका विजय खूप महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय संघ खूप काळानंतर वनडे सामने खेळण्यासाठी उतरला होता, पण भारताच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी संघांची तयारी चांगली कशी आहे हे दाखवून दिले. रोहित शर्माने शतक झळकावत तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावत मोठ्या प्रतिक्षेनंतर पुनरागमन केलं. तर मोहम्मद शमीने देखील फिट होत संघात पुनरागमन करत चांगली कामगिरी केली. श्रेयस अय्यरलाही मोठ्या कालावधीनंतर संघात संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच सामन्यापासून प्रभावी कामगिरी केली आणि आपल्या खेळीची छाप पाडली.

  -----------------------------------------