मुंबई :उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपलीभर लिंबू सापडले होते, तसे एकनाथ शिंदे यांनीच मला सांगितले होते, असे म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.यावर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत , याचे उत्तर काळ्या जादूवल्याने द्यावे, माझ्या नादाला लागू नका, असा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
रामदास कदम म्हणाले, काळ्या जादूबद्दल बोलू नका. काळी जादू काय असते हे उद्धव ठाकरे यांनाच विचारा. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपलीभर लिंबू सापडले होते, असे एकनाथ शिंदे यांनीच सांगितले होते. उद्धव ठाकरे बुके घेऊन फडणवीस यांना भेटायला जातात. आणि दुसऱ्या बाजूला अमित शाह यांना अफजल खान म्हणतात. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद कसे निर्माण होतील हा त्यांचा हेतू आहे.
----------------------------------

