मुंबई : सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही. लाडक्या बहिणींना वाढवून पैसे देणार नाही असे आम्ही म्हटलेले नाही. पण एकंदरीतच आर्थिक परिस्थिती बघून, आमची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही ते देऊ, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात दिली.
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. महायुती सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. तेव्हा अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतात, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. 10 मार्च रोजी अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र या योजनेचा सन्मान निधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सभागृहात निवेदन सादर करताना उपरोक्त माहिती दिली.
------------------------------------------

