कोल्हापूर न्यूज नेटवर्क
निपाणी राधानगरी राज्य मार्गावर हमिदवाडा कारखान्या नजीक मारुती अल्टो गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी हॉटेलमध्ये शिरल्याने हॉटेल मालक जखमी झाले आहेत .हा अपघात सोमवार दि.२४ मार्चला दुपारी झाला.
मुरगुड कडून निपाणी कडे जाणाऱ्या अल्टो गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अल्टो गाडी हमिदवाडा कारखान्यासमोर असणाऱ्या हॉटेल शाहूमध्ये घुसल्यामुळे हॉटेल मालक सदरूद्दीन बाबालाल नाईक (वय 70 ) राहणार नानीबाई चिखली हे जखमी झाले असून त्यांच्यावर हमीदवाडा येथील डॉक्टर इनामदार यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . तर उमर शब्बीर नाईक (वय२२) किरकोळ जखमी झाला आहे .
----------------------------------------------


