कोल्हापूर न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याचा धिक्कार असाे अशा घोषणा देत प्रशांत कोरटकर वर आज कोल्हापूर न्यायालय परिसरातच प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही हल्ला करण्यात आला .
आजच्या सुनावणीसाठी पोलिसांनी कोल्हापूर कोर्ट परिसरात कडक बंदोबस्त लावला होता. पण त्यानंतरही अमित भोसले नामक वकिलाने प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच त्यांना धरल्याने पुढील प्रसंग टळला.
यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकरच्या कोठडीवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित भोसले कोर्टरुममध्ये आले. त्यांनी तिथेच कोरटकरवर 'ये पश्या' म्हणत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रसंगामुळे कोर्ट परिसरात एकच धावपळ उडाली होती.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कोल्हापूर कोर्टाने त्याला आज 2 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. फिर्यादी पक्षाने कोरटकरने फरार असताना कुठे व कसा प्रवास केला? विशेषतः त्याने या कालावधीत कोणत्या वाहनांचा वापर केला? याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने ती मान्य केली.
दरम्यान , वकील अमित भोसले आज सकाळपासूनच प्रशांतला कोरटकर ला प्रसाद देणार असल्याचे सांकेतिक भाषेत उल्लेख करत सहकाऱ्यांना सांगत होते अशी माहिती समोर आली आहे .
----------------------------------

