श्री बाळूमामा मंदिराची सफाई मोहीम सुरू.

Kolhapur news
By -

                 


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिरात मोठा भंडारा उत्सव पार पडला.आमावस्या  व त्यानंतर आलेला गुढी पाडवा यामुळे मंदिरात भाविकांची रीघ सुरू होती.पाडव्या नंतर व्यवस्थापनाने आवाहन केल्या प्रमाणे अनेभक्तांनी विनामूल्य स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.बाळूमामांचे भक्त व मंदिरातील सेवेकरी यांनी विनामोबदला मंदिर व परिसराची स्वच्छता केली.

     

  देवस्थान समितीच्या शासन नियुक्त कार्याध्यक्षा रागिणी खडके म्हणाल्या की श्रींच्या वर एवढी अपार श्रद्धा याच क्षेत्रात पहायला मिळाली.पूजाअर्चा,दर्शन नवस , हार, खेटे,कौल इत्यादी पेक्षा   निरिच्छ राहून मनोभावे सेवा केल्यास श्रींची कृपा निश्चित लाभते अशी एक श्रद्धा इथल्या भाविकांच्यामध्ये पहायला मिळाली असेही त्या म्हणाल्या.

     

 समिती अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले, सचिव संदीप मगदूम ,सरपंच विजय गुरव यांनी ही अशाच प्रकारचे मनोगत व्यक्त केले.एक किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल होऊन सुद्धा अमावस्या व भंडारा यासारख्या अन्य उत्सवात वाहतूक नियंत्रण समस्या पोलिस प्रशासनाला भेडसावत रहाते.

  

दोन तीन राज्यातून येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी हेच याचे कारण आहे.स्वयंसेवकांना या साठी सुद्धा सज्ज रहावे लागते.विशेष असे की ही सर्व कामे श्रींच्या वर असलेल्या श्रद्धेपोटी होत रहातात.




    

         ---------------------------------