मुंबई : एस टी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला नियमित वेतन दिले जाईल अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
एस टी कर्मचाऱ्यांना फक्त ,५६ टक्केच वेतन मिळाल्याची तक्रार एस टी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली होती.
शासनाने महिलांना व ज्येष्ठ नागरिक यांना अर्धी व अमृत योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना पूर्ण प्रवास सवलत दिली आहे. या सवलती तसेच अन्य सवलतींच्या प्रतिपूर्ती ची रक्कम शासनाकडून वेळेवर न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळाले नव्हते.संघटनेच्या तक्रारी नंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लगेच वित्त विभागाशी संपर्क साधून ही त्रुटी दूर केली आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना यापुढे महिन्याच्या सात तारखेला पूर्ण वेतन मिळेल अशी ग्वाही दिली आहे.
त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यां मध्ये समाधानाचे वातावरण आहे.
-------------------------------