कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड जवळील वेदगंगा नदीवरच्या कुरणी बंधाऱ्याला मोठी गळती लागली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.ऐन उन्हाळ्यात ही गळती सुरू झाल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
कोल्हापुरी पद्धतीच्या या बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम सुद्धा अनेकदा रखडले आहे. त्यामुळे गळती वाढत जाऊन शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. नदीपलीकडील कुरणी, चौंडाळ ,भडगाव ,मळगे बुद्रुक, सावर्डे, पिंपळगाव इत्यादी गावे या बंधाऱ्यामुळे मुरगुड शहराला जोडली जातात.
या बंधाऱ्यावरून नागरिकांची ,विद्यार्थ्यांची दुचाकी वाहनांची ,तसेच अवजड वाहनांची नित्य वाहतूक सुरू असते. वाढलेल्या रहदारीमुळे बंधारा आधीच कमकुवत झाला आहे आणि त्यात ही मोठी गळती सुरू झाली आहे.बानगे पुलाप्रमाणे याही ठिकाणी एक मोठे पुल व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. या सर्व बाबींकडे पाटबंधारे खात्याचे लक्ष वेधण्यात येत आहे.
या गंभीर समस्येवर त्वरित कार्यवाही व्हावी अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे निवेदन नागरिकांनी पाटबंधारे विभागाला द्यायचे ठरवले आहे.
--------------------------
-