कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी प्राथमिक, माध्यमिक सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती यांच्यावतीने निपुण महाराष्ट्र ऑनलाईन कार्यक्रमाच्या बहिष्कारच्या निमित्ताने सोमवार दिनांक ७ एप्रिल रोजी शिक्षण आयुक्त राहुल रेखावार यांची पुणे भेट घेऊन याबाबतच्या अडचणी व संघटनात्मक मागणी यांची सविस्तरपणे चर्चा करण्यात आली .
पण प्रशासन आपल्या मुद्द्यावर ठाम असल्याने त्यांनी सदरचा उपक्रम अमलबजावणी करावी. अशी विनंती केली.
मात्र सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने अंतिम निर्णय असा घेण्यात आलेला आहे की, 15 जून 2025 पर्यंत निपुण महाराष्ट्र ऑनलाइन कामावर बहिष्कार कायम राहील. याबाबतचे ऑफलाईन काम करण्याचे आहे. कोणीही कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन कामकाज करू नये , तसेच ऑनलाईन कामकाज न केल्यामुळे जर कोणत्याही मुख्याध्यापकावर शिक्षकांवर कारवाई झाल्यास त्यांच्यासोबत सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती ठामपणे पाठीशी राहील , असा विश्वास समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
समन्वय समिती...
प्रसाद पाटील, राजाराम वरूटे ,भरत रसाळे, सुनिल पाटील, प्रमोद ताैंदकर, राजेंद्र कोरे , गौतम वर्धन, सुधाकर सावंत, संतोष आयरे, दिलीप माने, प्रकाश मगदुम , संजय जगताप, मंगेश धनवडे, बाळासाहेब निंबाळकर , गजानन कांबळे , सुरेश साेनगेकर, तानाजी घरपणकर ,उमेश देसाई, डी पी पाटील, एस के पाटील . सदाशिव शिंदे .
----------------------------------