छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Kolhapur news
By -

             


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


           छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी मुरगूड शहरांमध्ये त्यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली. मुरगूड शहरांमध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी आपले जनक बंधू सर पिराजीराव घाटगे यांना  सर पिराजीराव तलावाची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले .यामुळे मुरगूड शहराचा आणि यमगे आणि शिंदेवाडी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच पण यमगे शिंदेवाडी गावची सर्व शेती ओलिताखाली आली.याचवेळी छत्रपती शाहू महाराज यांनी मुरगूड येथे पिण्याच्या चावीचे उद्घाटन केले .

   

 या घटनेला 100 वर्ष उलटून गेली तरी या  नळामधून पाणी अव्याहतपणे सुरू आहे .त्याचा येथील नागरिक वापर करत आहेत .शंभर वर्षांपूर्वी सायफन पद्धतीने मुरगूडच्या  तुकाराम चौकातील  बिरोबा मंदिराजवळ पाणी आणले होते.तो  हौद आजही सुस्थितीत आहे.त्यावेळी शाहू महाराज स्वतः उपस्थित होते .

   

 सार्वजनिक जीवनातील शेवटच्या मोजक्या कार्यक्रमापैकी एक म्हणून हा कार्यक्रम ओळखला जातो. या पिण्याच्या पाण्याच्या चावीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले .छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेली सर्व ठिकाणी त्यांची स्मारके म्हणून ओळखली जातात. या प्रसंगी ओंकार पोतदार ,बबन बार देसकर   इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. 


यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार,स्वच्छता मुकादम बबन बारदेस्कर, महादेव वंदुरे ,मधुकर शेणवी ,सिकंदर पापा जमादार,शिवाजी गोंधळी ,राजू जमादार,प्रदीप कोळी,मोजेस डिसोजा ,प्रशांत कुडवे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


      ----------------------------------