कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित, वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावचा १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल ९८.९९ टक्के ,कला शाखेचा निकाल ८२.१४ टक्के इतका लागला असून ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल ९० टक्के इतका लागल्याने ज्युनिअर कॉलेजने दैदिप्यमान यश संपादित केले आहे.
विज्ञान शाखा यश संपादित विद्यार्थी प्रथम क्रंमाक कु.संस्कार रणजीत पाटील (82.83% ),द्वितीय क्रमांक कु. अस्मी सचिन मोरे
( 81.33 ),तृतीय क्रमांक कु. सानिया सुरेश अनुसे
( 80% )
कला शाखा यश संपादित विद्यार्थी
प्रथम क्रमांक कु. रिया गणपती बिद्रे (81.17% ),द्वितीय क्रमांक कु. आदिती अंकुश सुतार
(68.17% ), तृतीय क्रमांक कु. सोनल विलास वागवे
( 66.50% )
या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ. सौ. मंजिरी मोरे- देसाई , प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे ,कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर , कौन्सिल सदस्य ए. ए.पन्हाळकर, संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे यांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका सौ. आर. आर. पाटील , उपमुख्याध्यापक एस. एच. निर्मळे , पर्यवेक्षिका सौ. यु.सी. पाखरे, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. ज्युनिअर कॉलेजने बारावी परीक्षेतील निकालाची यशस्वी परंपरा कायमस्वरूपी ठेवल्याने सर्व विद्यार्थी व पालक वर्ग यांच्यातून वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे अभिनंदन होत आहे.
-----------------------------