अखेर भारताने बदला घेतलाच : ९ दहशतवादी स्थळावर रात्री उशिरा हवाई हल्ले

Kolhapur news
By -

 

           


    नवी दिल्ली:पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी  केलेल्या हल्ल्याचा बदला भारताने एयर स्ट्राइक करून घेतला. पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर जबरदस्त एअर स्ट्राइक करण्यात आला. यामध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर अखेर यशस्वी झाले.


भारताने हे एअर स्ट्राइक रात्री दीड वाजता केले असून या एअर स्ट्राइक मध्ये १००हून जास्त दहशतवाद्यांना जिवंत गाडलं गेले आहे. तसेच 50 हून अधिक दहशतवादी जखमी झाले आहेत.


पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हल्ले करण्यात आले.


ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती.  वृत्तसंस्था एएनआयनुसार, लश्कर आणि जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे.


पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते. 

एअर स्टाईक विषयी सविस्तर माहिती देण्यासाठी सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद होणार आहे. 


  ---------------------------------------