नवी दिल्ली : रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी देशभरातील रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, जर मोटार वाहनामुळे रस्ता अपघात झाला तर जखमी व्यक्तीवर या योजनेअंतर्गत उपचार केले जातील. याअंतर्गत, अपघात कोणत्याही रस्त्यावर झाला असला तरी, जखमींना कॅशलेस उपचार दिले जातील. यासाठी जखमी व्यक्तीला १.५ लाख रुपयांपर्यंत कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.
मात्र जर खर्च १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे स्वतः द्यावे लागतील
----------------------------------