नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत युद्धबंदी झाल्यानंतर ५१ तासांनी, पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री देशाला संबोधित केले. ऑपरेशन सिंदूरबद्दल पंतप्रधान म्हणाले , ज्या दहशतवाद्यांनी आपल्या माता-भगिनींचे सिंदूर पुसले होते, त्यांचा आम्ही नाश केला आहे. आमच्या कारवाईत १०० हून अधिक भयानक दहशतवादी मारले गेले आहेत.
युद्धबंदीबाबत पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने संघर्ष थांबवण्यास सहमती दर्शविली आहे. ते म्हणाले की, भारताने पाकिस्तानविरुद्ध फक्त लष्करी कारवाई पुढे ढकलली आहे. पाकिस्तानचा दृष्टिकोन पाहून आम्ही पुढील कारवाईचा निर्णय घेऊ.
पंतप्रधान म्हणाले की , पाकिस्तानकडून येणारा अणुहल्ल्याचा धोका खपवून घेतला जाणार नाही. भारताच्या तिन्ही सैन्याने सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.
---------------------------