कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले.
"हौसले बुलंद हो तो मंजीले भी चरण चुमती है."
हे उद्गार आहेत आपल्या सैन्याचे डी जी एम ओ म्हणजे सैनिकी कारवाईचे प्रमुख ले.जनरल राजीव घई यांचे .
भारतीय सेनेचे इरादे किती बुलंद होते हे यावरूनच समजते.पत्रकार परिषदेत बोलतानाचे त्यांचे हे उद्गार साऱ्या देशाच्या तरुणाईने सुद्धा ऐकले आहेत.हवाई दल प्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार यांनीही संत तुलसीदास यांच्या रामचरितमानस मधील एक काव्य पंक्ती म्हणून दाखवली.
"भय बिनू होई न प्रीत "
भीती असेल तर प्रेमाचा उमाळा येतो.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा नायनाट करण्याचा विडा भारतीय सेनेने उचलला होता. पाकिस्तानी सेना आडवी आली. आपल्या तिन्ही सेनादलानी त्या सेनेचा माज उतरवला.नुसता उतरवला नाही तर भीतीने गुढघे टेकून पाक सेनेला शरण यायला लावले.
थोडा तर्क लढवा.
शस्त्र संधी चा निर्णय झाल्यावर दोन तीन तासात श्रीनगरवर पाक सेनेने मिसाईल हल्ले केले.हे कसे काय ? उताणा पडल्यावर सुद्धा पाठीला माती कुठं लागलीय असं म्हणणारा मल्ल आठवा.मी कुठं हरलोय म्हणून पंचाना जाब विचारतो तेव्हां पंच सांगतो ही मॅटवरची कुस्ती आहे.पाठीला माती लागत नाही ती घामाघूम होते.१९७१ ला सुद्धा शरणागती नंतर पाक सेनानीने खांद्यावरच्या बकल्स फाडल्या होत्या. हार होते तेंव्हा अशीच प्रतिक्रिया होत असते.
पाकिस्तानी सेनेची अवस्था अशीच झाली होती.भारतीय सेनेचा रुद्रावतार पाहून त्यांच्यात भीती निर्माण झाली.अमेरिकेची मध्यस्तीही कामी आली असावी आणि पाकने शस्त्र संधी स्वीकारली. आपल्या सेनेचे साहस,शौर्य ,आणि हौसला भारताच्या तमाम तरुणाईला प्रेरणा देणारा आहे.
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये सांगितले की आमची लढाई दहशतवादाच्या विरोधात होती व आम्ही त्यापासून मागे हटणार नाही. टेरर आणि ट्रेड ,टेरर आणि टॉक एक साथ नहीं होंगे असे स्पष्ट शब्दात सांगितले. परमाणु युद्धाची धमकी देऊ नका . आम्हीं डगमगतनाही.दहशतवादाला पाठिंबा द्याल तर पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्यात येईल.
पाकिस्तान यापुढे आतंकी हल्ल्याची आगळीक करेल तर त्यांना पी ओ के सुध्दा गमवावे लागणार आहे . पाकिस्तानला केवढा मोठा इशारा दिला आहे !
म्हणूनच डिजीएमओ यांचे ते वाक्य प्रेरणादायक आहे .
हौसले बुलंद हो तो मंजिले भी पाव चुमती हैं.
-------------------------------------