नानीबाई चिखलीत बुद्ध जयंती विविध उपक्रमांनी साजरी

Kolhapur news
By -

 

               

    


      कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 

      नानीबाई चिखली येथील बौद्ध नगर मध्ये  "तथागत भगवान बुद्ध" यांची जयंती विविध शैक्षणिक ,सांस्कृतिक, धम्मकार्याच्या उपक्रमांनी  साजरी करण्यात आली. 


सोमवारी सकाळी  "ध्वजारोहण, सामूहिक बुद्ध वंदना, गाथा पठाण घेण्यात आले. यानंतर "तथागत गौतम बुद्ध" यांच्या जीवनावरील थ्रीडी चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी  "डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्य" या परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


 जयंती महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आले. यानंतर प्रथमेश देसाई (युवा धम्म अभ्यासक- कोल्हापूर) यांचा धम्मदेसनेचा (प्रवचनाचा) कार्यक्रम झाला.


 सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मार्गदर्शक शिक्षण प्रेमी महादेव इराप्पा कांबळे (वृक्ष मित्र) , अल्लाबक्ष सय्यद सर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य) सूर्यकांत कुंभार (ग्राम विकास अधिकारी ,चिखली), अमृता कांबळे (पोलीस पाटील), राहुल माने, उमाजी कांबळे सर (शिक्षक नेते) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


 या कार्यक्रम प्रसंगी बौद्ध नगर ,पंचशील नगर, आण्णाभाऊ साठे नगर तसेच नानीबाई चिखली मधील  नागरिक, उपासिका- उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  
            ---------------