कोल्हापूर न्यूज / वि. रा. भोसले
१४० वर्षाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष.या पक्षाने एकापेक्षा एक महान नेते या राष्ट्राला दिले.गांधी,नेहरू,सुभाष,वल्लभ भाई , लोकमान्य टिळक,सरोजनी नायडू,मौलाना आझाद, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी,मनमोहन सिंग,गुलजारीलाल नंदा,असे एकापेक्षा एक विद्वान आणि वैचारिक बैठक असलेले नेते या देशाने पाहिले. स्वातंत्र्य चळवळीत लाठ्या खाल्लेले,तुरुंगवास भोगलेले, तुरुंगात राहून लिखाण केलेले,वृत्तपत्रे सुरू केलेले, लाखोंच्या समुदायासमोर भाषणे करणारे असे कितीतरी प्रगल्भ नेते या पक्षाने देशाला दिले आहेत.
यापैकी कोणीही रामाला काल्पनिक मानले नाही.याच पक्षाचे पहिल्या फळीचे नेते असलेले राहुल गांधी मात्र राम हे काल्पनिक पात्र होते असे म्हणतात. त्यांच्या सामान्य ज्ञानाची कींव करावीशी वाटते.
संसदेत विरोधी पक्षनेता असलेला हा नेता इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करेल असे वाटले नव्हते.श्रीराम हे अयोध्येचे राजा होते.नेपाळ मधील जनक राजाचे जावई होते. लंकेच्या रावणावर विजय मिळविणारे महान योद्धा होते .
हे सगळं राहुल गांधीना काल्पनिक वाटतं ?
आजही अयोध्या,नेपाळ,लंका ,१४ वर्षाच्या वनवासाचा मार्ग, एवढेच काय लंकेला जोडणारा रामसेतु सुद्धा अस्तित्वात आहेत.संशोधनातून हे सारे सिद्ध झाले आहे.
अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने राम सेतूचे फोटो अंतराळातून घेतले.
आणखी काय हवं ?
देशाचा जबाबदार खासदार आणि विरोधी पक्ष नेता केवळ विरोधासाठी विरोध म्हणून जर अशी वक्तव्ये करत असेल तर तो देशाच्या संस्कृतीचा,अस्मितेचा अवमान आहे.विशेष म्हणजे त्यांनी ही विधाने परदेशात सुद्धा केली आहेत.
ज्यांची प्रेरणा घेऊन शिवछत्रपतींनी राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा दिला त्यांचाही अवमान आहे असं म्हटल्यास वावगे नाही.
वर उल्लेख केलेल्या महान काँग्रेस नेत्यांचा सुद्धा तो अवमान आहे.
राम रावण युद्ध ,महाभारत युद्ध यांची भौगोलिक स्थाने सुध्दा अस्तित्वात आहेत.अयोध्येच्या श्रीराम मंदिरास भेट देऊन त्यांनी रामाचा जाज्वल्य इतिहास पहावा. पुराण नव्हे.
राहुल गांधीचे हे विधान म्हणजे कोट्यवधी राम भक्तांच्या श्रद्धेचा अवमान आहे.
पप्पू या बाळबोध नावाचा मात्र तो सन्मान आहे.
---------------------------------