हजारोंच्या गर्दीतही शांत राहणारा बलराज अश्व

Kolhapur news
By -
 




आषाढी वारीतील लक्षवेधी रिंगणात धावण्यासाठी वर्षभर बलराजला रिंगण सोहळ्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. याशिवाय हजारो भाविकांसोबत चालावे लागत असल्याने त्यासाठीचेही विशेष प्रशिक्षणही अश्व बलराजला देण्यात आले आहे. त्यासाठी त्याला वर्षभर हरभरा, गुळ, दुध, तूप, गव्हाचा भूस्सा असा खास खुराक दिला जात होता. आषाढी वारीसाठी रवाना होण्यापूर्वी महिनाभर आधी या खास खुराकाबरोबर शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन व कॅल्शियमयुक्त असे विशेष खाद्य दिले जाते. देहू ते पंढरपूर असा आषाढी पायी वारीचा प्रवास असणारी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहुच्या वाड्यातून प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात अश्वाच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी 40 वर्षांपूर्वी सुरु केला. त्यांच्या पश्चात डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या आई पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी अश्वसेवा सुरुच ठेवली आहे.
 
आषाढी वारीसाठी मोहिते पाटील यांचा बलराज अश्वाची वर्षभर देखभाल अश्व प्रशिक्षक पहात असतात. बलराजची तेलाने मालिश करुन सर्वांग तगडे केले जाते. त्याचबरोबर गोल रिंगणाकरीता धावण्याचं प्रशिक्षणही देण्यात येते. आषाढी वारीसाठी रवाना झालेला बलराज अश्व हा महाराणा प्रताप यांच्याकडे असलेल्या अश्व चेतक याच्या रक्त गटातील आहे. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेण्यासाठी बरोबर डॉक्टर व 5 जणांची प्रशिक्षक बलराज सोबत  आहेत. वारीच्या वाटेवर त्याला हिरवा चारा, गहू, भुस्सा, दूध, तूप, हरभरा, गुळ असा खुराक सोबत देण्यात आला आहे. 



                   ------------------