कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील हॉस्पिटल ला 'बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर' पुरस्कार

Kolhapur news
By -

 

           


       कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        लाखो रुग्णांपर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या आणि अत्याधुनिक उपचारांद्वारे आरोग्य सेवक उल्खलेनीय योगदान देणाऱ्या कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा 'बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर' म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी केंदीय मंत्री पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप "नवभारत"च्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला.


यावेळी 'नवभारत'चे संचालक वैभव माहेश्वरी, रुबी क्लिनिकचे सीईओ बेहराम खुदाई आदी उपस्थित होते. मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या ८ व्या 'हेल्थ केअर समिट' मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


कदमवाडी येथे २००३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या डी वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून गेल्या २२ वर्षापासून लाखो रुग्णांना निरंतरपणे किफायतशीर दरात आरोग्यसेवा पुरविली जात आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारावर उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यांचे आयोजन केले जाते.


            -----------------------