कोल्हापूर मनपा प्राथमिक शाळांकडील मुख्याध्यापक, विषय शिक्षक व सहा, शिक्षकांची सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षक सर्वसाधारण चदली प्रक्रिया समुपदेशन पध्दतीने होणार

Kolhapur news
By -

 

          


       कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर कार्यक्षेत्रातील मनपा प्राथमिक शाळांकडील मुख्याध्यापक, विषय शिक्षक व सहा, शिक्षक कर्मचा-यांची सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षक सर्वसाधारण चदली प्रक्रिया समुपदेशन पध्दतीने होणार आहे. सदरची शिक्षक सर्वसाधारण बदली प्रक्रिया  उपआयुक्त (२), कोल्हापूर महानगरपालिका यांचे उपस्थितीत मंगळवार दिनांक १०.०६.२०२५ रोजी सकाळी ०९.३० वाजता म.न.पा. वि.स.खांडेकर विद्यामंदिर, कोल्हापुर या ठिकाणी पार पाडणेत येत आहे.


शिक्षक संवर्गातील बदली प्रक्रिया समुपदेशन पध्दतीने होणार असलेने कार्यालयाचे स्तरावरुन खालील नियोजनाप्रमाणे बदली कामकाज पार पाडणेत येणार आहे. तरी संबंधीत फक्त बदली पात्र कर्मचा-यांनी मंगळवार दिनांक १०.०६.२०२५ रोजी म.न.पा. वि.स.खांडेकर विद्यामंदिर, कोल्हापूर ठिकाणी खालील नियोजनानुसार उपस्थित रहाणेचे आहे. सोबत ओळख पत्र आवश्यक आहे. ओळखपत्र नसल्यास प्रवेश दिला जाणार नाही  असे कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी आर.व्ही. कांबळे यांनी कळविले आहे. 



टिप :- बदली पात्र मुख्याध्यापक/शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांना बदली ठिकाण प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद


              -----------------------