निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण समारोप

Kolhapur news
By -

 

             


        कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        "आपल्या दैनंदिन वर्ग अध्यापनातून भारतीय भाषा,कला व संस्कृतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर अधिव्याख्याता अश्विनी पाटील यांनी केले.

   

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील सभागृहात आयोजित निवड वेतनश्रेणी दहा दिवसीय सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण उच्च माध्यमिक गट वर्गाच्या सांगता समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

   

  मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डाॅ.जी.व्ही.खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सर्व सुलभकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सुलभक प्रमुख प्रा.एस.आर.वावरे (दूधसाखर महाविद्यालय, बिद्री),प्रा.एस. बी.मोहिते(डी.सी. नरके महाविद्यालय,कुडित्रे),प्रा.एम.वाय.साळुंखे (अण्णासाहेब डांगे महाविद्यालय,हातकणंगले) ,प्रा.एम.डी.पाटील (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय,कोल्हापूर),प्राचार्य ए.एस.देवकर (एम.आर.कॉलेज, गडहिंग्लज) यांनी मार्गदर्शन केले.प्रा.रवींद्र पाटील,प्रा.महावीर मसुटे,प्रा.रेखा अकिवाटे,प्रा. तुकाराम पाटील,प्रा.सोमलिंग तेली,प्रा.दीपक माळी,प्रा.दिनकर पाटील,प्रा.संजय डकरे,प्रा. संतोष बोधे,प्रा.संजय पोतदार,प्रा.चंद्रकांत वाघरे,

प्रा.अस्लम पखाली,प्रा.सरस्वती मगदूम,प्रा.

सर्जेराव धनगर यांनी मनोगत व्यक्त केले.

    यावेळी प्रा.डॉ.जालंदर पाटील,प्रा.तानाजी  यादव,प्रा.वनिता खडके,प्रा.शिवाजी सावंत,प्रा.  एकनाथ चौगुले,प्रा.विलास अलदार,प्रा.प्रवीण बनसोडे,प्रा.कलीम मोमीन,प्रा.दत्तात्रय पुंगावकर, प्रा.दादासाहेब श्रीराम,प्रा.उत्तम पाटील, प्रा.शामराव वडर आदी उपस्थित होते.

बळवंतराव यादव महाविद्यालयाचे प्रा.किरण माळी यांनी सूत्रसंचालन केले.देवचंद महाविद्यालयाचे प्रा. भरत पाटील यांनी आभार मानले.






         



    




कोल्हापूर-

१)येथील निवड वेतन श्रेणी दहा दिवसीय सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण उच्च माध्यमिक गट वर्गास मार्गदर्शन करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर शेजारी प्रा.एस.आर.वावरे,प्रा.

एस.बी.मोहिते,प्रा.एम.वाय.साळुंखे,प्रा.एम.डी पाटील आदी

२) सुलभक प्रमुख प्रा.एस.आर.वावरे यांचा सत्कार करताना प्रा.सर्जेराव धनगर

३) सुलभक प्रा.एम.बी.मोहिते यांचा सत्कार करताना प्रा.एकनाथ चौगुले

४)सुलभक प्रा.एम.वाय.साळुंखे यांचा सत्कार करताना प्रा.विलास अलदार

५) सुलभक प्रा.एम.डी.पाटील यांचा सत्कार करताना प्रा.वनिता खडके

६) मनोगत व्यक्त करताना प्रा.रवींद्र पाटील 

७) मनोगत व्यक्त करताना प्रा.महावीर मसुटे

८) मान्यवरांच्या समवेत प्रशिक्षणार्थी प्राध्यापक


            -------------------------