मुंबई : आता गाड्यांचे आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार केले जाईल. आतापर्यंत हा चार्ट फक्त ४ तास आधी तयार केला जात होता. यामुळे प्रवाशांना पर्यायी प्रवास निवडण्यासाठी किंवा तिकीट कन्फर्म न झाल्यास दुसरे तिकीट बुक करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्ड लवकरच हे बदल टप्प्याटप्प्याने लागू करेल.
------------------