हिंदी सक्ति रद्द झाली.मराठी साठी लढणाऱ्यांची मुले मात्र कॉन्व्हेन्ट मध्ये शिकली.

Kolhapur news
By -

 

      


              कोल्हापूर न्यूज /  वि रा भोसले


पहिली पासून हिंदी चा जी आर मागे घेण्यात आला.खरं तर हा जी आर त्रिभाषा सूत्र या शैक्षणिक धोरणाचा भाग होता.हे धोरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांनाच स्वीकारले होते.ते सत्तेवरून गेले.त्या सत्तेसाठी त्यांनी काय काय नाही केले ?

     असो ,ते सगळ्या महाराष्ट्राला सुद्धा माहीत आहे.एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले होते ते त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून नव्हे तर पक्षातील अन्यायकारक हुकूमशाही आणि हिंदुत्ववादापासून उद्धव ठाकरे दूर जाण्याचे धोरण हे होते. दिल्लीच्या नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्री केले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले. दोघांनाही ते अनपेक्षित होते,पण दोघांनीही ते स्वीकारले व यशस्वीपणे निभावले सुध्दा. नंतर अजित दादा येऊन मिळाले.तिघांच्या युतीने विधानसभेत भरघोस यश मिळवले.

  या त्यांच्या यशामुळे हताश झालेले उद्धव ठाकरे यांना आता अशी भीती वाटू लागली आहे की आपण ज्या मुंबई महापालिकेवर मांड ठोकून बसलो होतो तिचे लगाम पण हातातून निसटले आहेत. आता ते पुन्हा हातात कसे येतील ही त्यांना चिंता.त्यामुळे पडती भूमिका घेऊन का होईना त्यांनी राज ठाकरे यांच्याशी युती केली असावी.मराठी भाषा नावाची एक भगिनी त्यांना अचानक रस्त्यात भेटली असावी. हिंदी ही तिची सवत शेजारी येऊन उभी राहिली आहे व तिला अर्धा हक्क द्यावा लागणार अशी भीती घालून दोन बंधु मराठी भगिनीच्या बाजूने उभे राहिले. गंमत आहे.

    हिंदीच्या सक्तीला तसा महायुतीमध्ये अंतर्गत विरोध होता.त्यामुळे जी आर मागे घेतला गेला.

    मुद्दा असा की मराठी साठी लढू इच्छिणारे  बंधू स्वतः कॉन्व्हेंट मध्ये शिकले आणि त्यांची पोरे सुद्धा कॉन्व्हेन्ट मध्ये शिकली.

   लगेच टाळा पसरू नये.पुढचे ऐका.

   वर्षातून एक दोनदा त्यांच्या परदेश वाऱ्या असतात.इंग्लंड मध्ये थेम्स नदीच्या काठी प्रॉपर्टी केली आहे असे ऐकायला मिळाले होते.मग आता मराठीचा उमाळा एकाएकी कसा आला ?

 मराठी वरचे त्यांचे प्रेम एकदम बेगडी आहे.

मध्यंतरी राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांच्या विरोधात आंदोलने केली .काही काळ मुंबईकरांनी मराठीच्या पाट्या लावल्या सुद्धा .कांहीं दिवस ही हवा होती नंतर ती विरून गेली. त्याचवेळी त्यांना काही मुंबईकरांनी वर नमूद केलेला कॉन्व्हेंट वाला प्रश्न विचारला होता. 

  राज ठाकरे त्यावेळी चिडीचूप झाले होते.

     महाराष्ट्राविषयी एवढे जर प्रेम असेल तर राहण्यासाठी येथे रमणीय अशी स्थळे कमि आहेत का ? 

     त्यासाठी इंग्लंडच  कशाला पाहिजे ?

    दिशा सलीयान ही  महाराष्ट्रीयनच होती ना ?

तिच्या गूढ मृत्यूची चौकशी का झाली नाही ? 

याबाबत आता न्यायालयात केस सुरू झाली आहे.

 बापरे, एवढे सगळे महाभारत पाठीशी असून सुद्धा त्यांना अचानक मराठीचा पुळका  का आला आहे ?

  राज ठाकरे  महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करणार होते ? कोठे आहे ती ?

 या बंधूसमोर कसलेही मिशन नाही. आंदोलने हेच त्यांचे मिशन.

  पहेलगाम घटनेच्या वेळी साऱ्या देशाने अश्रू ढाळले पण या बंधूंच्या  टिपण्या  राजकीय वाटाव्यात अशाच होत्या.त्यात संजय नावाचे एक पात्र मध्येच टिमकी वाजवायचे.


   लोकसभेत निसटता कौल मिळाल्यावर त्यांनी लगेच उंच व्यासपीठे उभी करून भाषणबाजी सुरू केली.विधान सभेत दारुण पराभव झाला तर ई व्ही एम वर ठपका. 

     कांहीं दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत.स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा मुंबईत अजून तग धरून आहे.ती ठिणगी घेऊन मराठी मतांची मशाल पेटवणे यासाठी सारी धडपड सुरू आहे.मुंबई मनपा एकदा गेली की हाती धुपाटणे राहणार आहे हे त्यांना उमगले आहे.

   बिचारी मराठी माय माऊली गारठून गेली होती. शाल पांघरून बसली होती .सुटली बिचारी संकटातून.


       ----------------------