मुरगूडमधील जनावरांच्या बाजारात दलदलीचे साम्राज्य.सुविधांचा अभाव.

Kolhapur news
By -

             


       कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        मुरगूडचा जनावरांचा बाजार दक्षिण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.कोकणातून आले की घाट माथ्यावरची  पहिली मोठी बाजार पेठ.

    जनावरांचा हा बाजार  दलदलीचे साम्राज्य बनले आहे. जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येणारे व्यापारी, शेतकरी यांना भाकरी सोडून खायला सुद्धा जागा नाही. व्यापारी व शेतकरी यांच्याकडून कर वसूल केला जातो पण कोणत्याही सुविधा नाहीत. दलदलीतून जनावरे चालवत न्यावी लागतात. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. 

    या बाजारातून नगरपालिकेला दर मंगळवारी चांगले उत्पन्नही मिळते. त्या मानाने सोयी कांहीच नाहीत.

  निवारा, टॉयलेट्स पिण्याच्या पाण्याची सोय, फरशी , पावसाच्या पाण्याचा निचरा, डास निर्मूलन , कॅन्टीन या सुविधा झाल्या पाहिजेत अशी मागणी करण्यात आली आहे.

    दूर दूर करून येणाऱ्या व्यापारी व शेतकरी यांना बाजारात खूप हाल सहन करावे लागतात. त्यांनी एकत्र येऊन या तक्रारी येथील सामाजिक कार्यकर्ते व नेतेमंडळी यांच्यासमोर मांडल्या आहेत. 

   त्यांच्या वतीने एक निवेदन सुद्धा कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहे.

   विनाविलंब कार्यवाही व्हावी व उपलब्ध सुविधा व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

    उपस्थित तक्रारदार प्रतिनिधी या प्रमाणे.सुरेश गोधडे, अशोक यादव, शिवाजी खंडागळे ,उत्तम पाटील ,धोंडीराम बेनिग्रे, रमजान तहसीलदार, तानाजी हसबे ,किरण चौगुले ,प्रकाश दरावर, संदीप चव्हाण ,विजय मेंडके, विनायक हसबे, प्रताप सावंत इत्यादी.







          ------------------------