जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष - जितेंद्र आव्हाड

Kolhapur news
By -

 

        


         मुंबई : जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पूर्णतः खोडसाळपणाचे असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार तथा मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे, असे ते म्हणालेत. आव्हाड यांच्या या दाव्यामुळे जयंत पाटलांच्या राजीनाम्याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.


जयंत पाटलांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बातमी शनिवारी सकाळी  सगळीकडे चालली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली आहे. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो, असे आव्हाड यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे जयंत पाटील हेच अद्याप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


          -------------