कोल्हापूर न्यूज / हेरले प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनापासून “एक पेड मा के नाम' ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. आईच्या नावाने एक झाड प्रत्येकाने लावणे असा या योजनेचा उद्देश असून पीएम मोदी यांनी या अभियानाला सुरवात केली आहे. त्यानुसार 'एक पेड माँ के नाम' हे अभियान राबविण्यात येत आहे.
हेरले (ता.हातकणंगले) येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था व शेतकरी विकास सेवा संस्था मर्या हेरले यांच्या वतीने हेरले येथे वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती राजेश पाटील व शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन कपील भोसले,माजी चेअरमन अशोक मुंडे , उदय चौगुले, सुनील खोचगे, संजय पाटील, सुरेश पाटील, शेतकरी सोसायटी व्हाईस चेअरमन लक्ष्मण निंबाळकर, अजित चौगुले किरण स्वामी, आदगोंडा पाटील, विजय मगदुम,गुरु नाईक, अनिल आलमान ,सुरेश पाटील,सेक्रेटरी नंदकुमार माने, रवी मिरजे,गुरु नाईक, प्रमोद तोड़कर उपस्थित होते.
हेरले येथील स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करत असताना माजी सभापती राजेशपाटील ,चेअरमन कपिल भोसले,अशोक मुंडे व इतर मान्यवर.
-----------------------


