कोल्हापूर न्यूज नेटवर्क
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथी कसोटी अनिर्णित ठेवणाऱ्या भारतीय क्रिकेट वीरांना खरंच सलाम करायला हवा.
पहिला डावात आपल्या 358 धावांना उत्तर देत इंग्लंडच्या टीमने 669 धावांचा डोंगर उभा केला . म्हणजेच 311 धावांचे लीड ठेवले. भारताच्या हातातून सामना पूर्णपणे गेला होता. सामना जिंकणे तर शक्यच नव्हते पण निदान हार टाळणे महत्त्वाचे होते.खेळाडूंनी दोन दिवस खेळून काढून हा सामनाअनिर्णित ठेवणे तसे कठीण काम होते.
साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. दुसऱ्या डावात जीवाचे रान करून पठ्ठे लढले. शुभमन गिलने कप्तानाला साजेसा खेळ केला. त्यांने शतक ठोकले. तो आऊट झाल्यानंतर पुन्हा तोंडचे पाणी पळाले. जडेजा आणि वॉशिंग्टन यांनी नंतर कमाल केली. गोऱ्यांना सामना जिंकू द्यायचा नाही असे त्यांनी ठाण मांडले. इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरश: त्यांनी घाम फोडला. गड लढवला. नुसता लढवलाच नाही तर दोघांनीही शेवटच्या काही षटकात शतके ठोकली.
येथे शिवरायांची आठवण येते. हिंदवी स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांनी मिर्झाराजे जयसिंग बरोबर पुरंदरचा तह केला होता. आग्र्याहून ते सुटून आले आणि पुन्हा त्यांनी स्वराज्य उभे केले. शुभमन गीलच्या संघाने शिवरायांची हीच प्रेरणा घेऊन पाचवा कसोटी सामना जिंकायचा आहे.सद्या २:१ ने इंग्लंड आघाडीवर आहे . चौथ्या सामन्यात हार टाळलीत याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा सलाम. पाचवा सामना जिंकलात तर हॅट्स ऑफ सॅल्यूट देऊ.मालिका बरोबरीत सुटेल.
जय भारत.
---------------------------