ग गुंडगिरीचा : म महानगरपालिकेचा : नवा धडा कर्ण अर्जुन युतीचा.

Kolhapur news
By -

              


          कोल्हापूर न्यूज / वि .रा. भोसले


       मराठी भाषेवरील  प्रेमा साठी कर्ण अर्जुन एकत्र आले. महाभारतात मात्र ते एकमेकांचे वैरीच होते. हे कलियुग आहे. येथे कांहीं ही घडू शकते.

 या बंधूंनी मराठीची नवी लिपी आणलेली आहे. या लिपीचा पहिला धडा त्यांनी पोरांनाच काय पण सरकारला सुद्धा शिकवला आहे. 


ग ग गुंडगिरीचा.

म म महापालिकेचा.

मराठी पहिलीत असताना आम्ही गुरुजींच्या छड्या खाऊन ग म भ 

न शिकलो आणि गिरवायलाही लागलो.

ग ग गणपती.

म म मका .

भ भ  भटजी.

 न न नळ 

      केवढं अवघड वाटायचं !

 आता किती सोप्प झालंय.

  ग  गुंडगिरीचा.

   म  महापालिकेचा.

काय म्हणताय लक्षात नाही आलं ?

    धाकटे बंधू म्हणाले .मराठीत बोलला नाही तर कानाखाली लावा.सरकार तिकडं विधान भवनात .आमचं सरकार रस्तावर.

    थोरले म्हणाले. आम्हांला गुंड म्हणता.मराठी साठी आम्हीं गुंडगिरी सुद्धा करू.त्यासाठी तर एकत्र आलोय.एकत्र राहणार .अंतरपाट आता नाही. टाका अक्षता.

     आमच्या डोक्यात यातलं काय बी घुस ना.

   तवर संजु दा कुठनं बोळातनं आला आणि म्हणाला .

    खुळ्या गत काय करताय ? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हाईत.त्यासाठी सगळं चाललंय.

     नाव मराठीच घ्यायचं आणि ४० टक्के मतदान पदरात पाडून घ्यायचं.

    आणि राहिलेल्या ६० टक्क्याचं काय करायचं ? 


   बाकीची वाटून घेतील.

आपल्याला खुर्ची मिळाली की बास झालं.

   म म मनपा .

आता समजल.

  भ भ म्हणजे काय ?

भ भ भटकंती.

    सगळ्या महाराष्ट्रात,इंडियात आणि परदेशात सुद्धा भटकंती करायची.

   न न नक्कल .बरोबर ?

अगदी बरोबर.

  पी एम, सी एम, दादा, दाढीवाला पुष्पा, सगळ्यांच्या नकला आम्हांला येतात.

   संजू दादा ;

 लई भारी झालं.लई सोपी हाय ही लिपी.


   सगळं ऐकून डोक सुन्न झालं.


    मराठी आमची माय बोली.बोलायला लागलो तेव्हां ओठातून पहिला शब्द आई असा आला. म्हणून मराठी आम्हांला सख्या आई सारखीच वाटते.

    करण अर्जुन ची मराठी मात्र सावत्र आई सारखी वाटते. रामायणातली कैकयीच जणू. 

  भरताला राज्य मिळावं म्हणून तिनं रामाला वनवासात पाठवलं.


   हे बंधू तेच करणार.

मुंबईचं राज्य मिळावं म्हणून तरण्या पोरांना वनवासात पाठवायला कमी करणार नाहीत.


   पण पोरं पण आता शहाणी झाल्यात.त्याचे वडील आणि काका , मामा अजून कोर्टाच्या फेऱ्या मारत फिरतात. त्यांच्या पोरा बाळांच्या शिक्षणाचा नुसता खेळ खंडोबा झालाय.

  बंधूंची पोरं मात्र परदेश वाऱ्या करतात.


 "मराठी आई, सांभाळ तूझ्या पोरांना."

तूर्त एवढंच.

जय महाराष्ट्र.


       ----------------------------