कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील गणेश नागरी पतसंस्थेचा सत्कार सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते व सेवानिवृत पोलिस महासंचालक भगवानराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सयाजी येथे करण्यात आला.
संस्थेने सर्व सामान्य सभासदांच्या आर्थिक उन्नती साठी अविरत काम केले आहे.सलग दहा वर्षे ही पतसंस्था कोट्यवधी रुपयांच्या नफ्यात आहे. उत्तम व्यवस्थापन, लोकाभिमुख पारदर्शक कारभार यामुळे संस्थेने तालुक्यात व जिल्ह्यात वेगळा लौकिक मिळविला आहे.स्व.लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे आपल्या संस्थेचे प्रेरणा स्रोत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
कार्यकारी मंडळ ,चेअरमन सोमनाथ यरनाळकर, संचालक उदय शहा ,मारुती पाटील,रेखा भोसले व व्यवस्थापक राहुल शिंदे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा हॉटेल सयाजी येथे संपन्न झाला. पत्रकार संघाच्या वतीने सुध्दा या वेळी सत्कार करण्यात आला.
एका दैनिकाच्या च्या वतीने संपन्न झालेल्या गौरव गाथा समारंभात मुरगूडच्या या पतसंस्थेचा सत्कार झाला.
--------------------------