राज आणि आमच्यात असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर केला - उद्धव ठाकरे : राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच मलाच मिळतील - देवेंद्र फडणवीस

Kolhapur news
By -

 

          


     मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. आमच्यात (राज व उद्धव) असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी. हे पाहून अनेक बुवा- महाराज आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, तर कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत आहेत. कदाचित रेडेही कापत असतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला.


         ----------------------

            


पंढरपूर : राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच मलाच मिळतील, अशा उपरोधिक सूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य केले आहे. मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असे सांगण्यात आले होते की, तिकडे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचे भाषण झाले, असे ते म्हणाले.


आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील नियोजनाचा आढावा घेत प्रशासनाने केलेल्या तयारीचे तोंड भरून कौतुक केले. आपल्या प्रशासनाने येथे अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. आता उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. निश्चितपणे यावेळी जशी उत्तम व्यवस्था झाली. आषाढीचे पर्व संपल्यानंतर काही उणिवा राहिल्या काय? हे पुन्हा पाहिले जाईल.


          -------------------------------