दादासो लवटे यांची आशियाई अजिंक्य पद स्पर्धे साठी भारतीय कुस्ती संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून निवड.

Kolhapur news
By -

 

                 


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI ) कुस्ती संकुल, मुरगूड जि. कोल्हापूर चे अंतराराष्ट्रीय प्रशिक्षक पै.दादासो लवटे यांची किर्गिस्थान येथे होणाऱ्या 15 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने नियुक्ती.

काही दिवसापूर्वी  नजफगड, दिल्ली या ठिकाणी युनायटेड वर्ल्ड रेसलिंग संघटना आयोजित लेवल -1 कोर्स उत्तीर्ण केल्यामुळे निवड

 स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंना करणार मार्गदर्शन.


मुरगूड येथे 2010 पासून कोच म्हणून कार्यरत 


दादासो लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई, जागतिक, रँकिंग सिरीज अशा वेगवेगळ्या  आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक प्राप्त कुस्तीगीर नावे

1.स्वाती शिंदे, 2.नंदिनी साळुंखे, 3.अमृता पुजारी, 4.तन्वी मगदूम, 5.नेहा चौगले 


शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कुस्तीगीर 

1.स्वाती शिंदे -2023

2.नंदिनी साळोखे -2024


आत्तापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 275 ते 300 पदके महिला व पुरुष कुस्तीगीरांनी मिळवली आहेत 


या आखाड्यातील अनेक कुस्तीगीर पदके मिळवून आर्मी, फॉरेस्ट ,पोलीस, रेल्वे ,एअर फोर्स,नेव्ही शासकीय सेवेत दाखल झाले आहेत 


या सर्व कार्याची दखल घेत भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंग 

सेक्रेटरी विनोद तोमर 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस,सरचिटणीस योगेश दोडके,कार्याध्यक्ष संदीप भोंडवे ,

पदाधिकारी रवींद्र पाटील,संजय तीरथकर 

यांनी निवड केली .

माजी खासदार.संजयदादा मंडलिक,कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक,सह-आयुक्त(प्रशासन)

राज्य उत्पादन शुल्क सुनील चव्हाण साहेब,सुखदेव येरुडकर, चंद्रकांत चव्हाण सर,डॉ प्रशांत अथणी यांचे प्रोत्साहन लाभले.


   ---------------------