कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"सदगुणांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे . या संस्काराने प्रेरित होऊन , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून "टीम तामीर " संस्थेने उर्दू शिक्षण संस्थांमधील गुणवतेचा सन्मान केला आहे . असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांनी केले .
ते " टीम तामीर " या संस्थेतर्फे कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यातली गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षकनेते दादा लाड हे होते . कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात हा कार्यक्रम झाला . यावेळी मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव दत्ता पाटील व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष इरफान अन्सारी हे मान्यवर पाहुणे उपस्थित होते .
अध्यक्षपदावरून बोलताना दादा लाड यांनी उर्दूशिक्षण संस्था मधील अनेकांना कोजिमाशी व मुख्याध्यापक संघामध्ये संधी दिल्याचे सांगून , टीम तामीर संस्थेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून तो महाराष्ट्रभर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली .यावेळी मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव दत्ता पाटील व इरफान अन्सारी यांनी मनोगते व्यक्त केली . प्रास्ताविक झुल्पीकार मुल्ला यांनी तर आभार रईस खान यांनी मानले सुत्रसंचलन इब्राहिम लक्ष्मेश्वर यांनी मानले . यावेळी दहावी मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या तिन्ही जिल्ह्यांतील सुमारे १०० विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला .
कार्यक्रमाला मुख्याध्यापक संघाचे संचालक माजिद पटेल , संचालक रविंद्र गुरव , मुस्लिम बोर्डिंगचे शाळा व्यवस्थापन चेअरमन रफिक शेख यांच्यासह सांगली 'सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थाचालक , मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते .
----------------------