मुंबई : शहरात देशातील सर्वात श्रीमंत लोक राहतात. मात्र, याच शहरात देशातला श्रीमंत भिकारी देखील राहतो. भरत जैन असं या श्रीमंत भिकाऱ्याचं नाव असून दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान व आसपासच्या भागात तो भीक मागतो. येथील रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या लोकांकडे तो भीक मागतो. भीक मागून तो दिवसाला दोन ते अडीच हजार रुपये मिळवतो. यातून तो महिन्याला सरासरी ७५ हजार रुपये जमवतो. मुंबई व आसपासच्या शहरांमधील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मुंबईकरांना दिवसाचे १२-१२ तास (आठ ते नऊ तास ऑफिस व दोन ते तीन तास प्रवास) कष्ट करूनही इतका पगार मिळत नाही.