वाघापूर येथे गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज यांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी.

Kolhapur news
By -

 

             


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


       श्री विठ्ठल बिरदेव ,श्री हालसिद्धनाथ, श्री बाळूमामा देवस्थान, आदमापूर येथील भाकनुक कार मानकरी  गुरु माऊली  श्री कृष्णात डोणे (वाघापूरे) महाराज यांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमा दिना निमित्त वाघापूर येथे भक्तांनी मोठी गर्दी केली होती.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  वाघापूर येथील श्री विठ्ठल बिरदेव यांच्या  दरबारामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता.सकाळी सात वाजता श्रींचा अभिषेक,   आठ वाजता पाद्यपूजन, नामस्मरण ,जप व ध्यान.दहा वाजता वारंग आरती , 11 वाजता महाप्रसाद, दुपारी एक वाजता भजन व धनगरी ओव्या आणि सायंकाळी सहा वाजता आरती असा गुरुवंदन सोहळा संपन्न  होतो.  


 गुरुमाऊली कृष्णात डोणे यांचा भक्त समुदाय महाराष्ट्रात व इतरत्र पसरलेला आहे.  गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदन सोहळ्यास दूरवरून भाविक आले होते.त्यांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला .  चि. बाबुराव कृष्णा डोणे यांचे नुकतेच निधन झाले  आहे. त्यांच्या स्मृती भक्तांनी साश्रू नयनांनी जागवल्या.यावेळी  कृष्णात डोणे महाराज यांचे बाळु महाराज व राजवीर कृष्णात डोणे हे देखील उपस्थित होते.

       



                  ---------------------