कोल्हापूर न्यूज नेटवर्क
दहा लाख झाडे लावून सावली पेरणारे आणि निसर्गसंवर्धनाच्या लढ्याला लोकचळवळीचे स्वरूप देणारे 'द ट्री मॅन' सयाजी शिंदे यांचा 66 वा जन्मदिवस या वर्षी एक पर्यावरणपूरक सोहळा गलगले येथील ‘सह्याद्री अंबाबाई देवराई’मध्ये 150 विविध प्रजातींची रोपे लावून करण्यात आला .
या अभिनव उपक्रमात सह्याद्री देवराई, सृष्टी पर्यावरणवादी संघटना निपाणी व ग्रामपंचायत गलगले यांचे संयुक्त विद्यमाने अंबाबाई देवराई शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरणप्रेमी व ज्येष्ट साहित्यिक माजी प्राचार्य जीवनराव साळोखे यांच्या मार्गदर्शनात झाले. यावेळी बोलताना जीवनराव साळाेखे म्हणाले, सयाजी शिंदेंचा जन्मदिवस वृक्षारोपणातून साजरा करणे, ही काळाची गरज असून तो एक सुवर्णक्षण आहे. त्यांचं कार्य ही समस्त समाजासाठी एक जागृत प्रेरणा आहे.
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या कागलच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे म्हणाल्या , द ट्री मॅन सयाजी शिंदे हे नाव आज निसर्गाच्या रक्षणासाठी प्रेरणादायी ब्रँड झालं आहे. त्यांनी फक्त झाडं लावली नाहीत, तर भावनिक नातं निर्माण केलं आहे .
कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यावरण प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रास्ताविक पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी केले. त्यांनी या उपक्रमामागील उद्दिष्टे व सह्याद्री देवराई चळवळीचे व्यापक स्वरूप उपस्थितांसमोर मांडले.मान्यवरांना गुलाबरोपे देऊन सत्कार करणेत आला.गलगलेचे माजी सरपंच विलास पाटील यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
राज्य पुरस्कार विजेती वनपाल प्रतिभा पाटील, प्रा. विदुला स्वामी, (पाणी फाऊंडेशन कार्यकर्त्या) निर्मला पाटील, सविता साळोखे (प्लास्टिक मुक्ती संघटना, कोल्हापूर) आदी उपस्थित हाेते.
कार्यक्रमाच्या आयोजनात सृष्टी पर्यावरणवादी संघटना संस्थापक फिरोज चाऊस, अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक डोनर, प्रा. शिवाजी मोरे, प्रा. कांचन बिरनाळे, सरपंच विद्याताई शिंदे , फिजा चाऊस, अजित पाटील,संजय चिखलीकर, पी. बी. कापसे, सुनील चौगुले, गणेश माळी, काकासाहेब कुंभार, जे. एल. आवळेकर, विश्वनाथ पाटील यांचा सहभाग होता.ग्रामसेवक विवेकानंद पाटील, महालक्ष्मी हायस्कूल व विद्यामंदिर गलगलेच्या विद्यार्थ्यांनी, व विविध गावांतून आलेल्या पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येत कार्यक्रमात चैतन्य भरले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेसीबी सहाय्य विनायक मोरे (हमिदवाडा), मानसिंग चव्हाण (लिंगनूर)यांचे विशेष सहकार्य लाभले.आभार उपसरपंच दत्तात्रय पाटील यांनी मानले.
.
महाराष्ट्रात एक सकारात्मक लाट
सयाजी शिंदे यांच्या ‘देवराई’ चळवळीने हजारो लोकांना निसर्गाच्या जवळ नेलं आहे. त्यांच्या नावे जन्मदिवशी झाडं लावून संपूर्ण महाराष्ट्रात एक सकारात्मक लाट निर्माण झाली आहे. माणसासारखंच झाडालाही वाढायचं असते फक्त सावली देण्यासाठी हे त्यांच्या कार्यातून वारंवार सिद्ध होतं.
--------------------------