मुंबई : राज्य सरकारने सुरू केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेसाठी लागणाऱ्या तब्बल ४५ हजार कोटी रुपयांच्या खर्चामुळे आता इतर जनहिताच्या योजनांवर थेट परिणाम दिसू लागले आहेत. 'आनंदाचा शिधा' यंदा सणासुदीच्या काळात दिला जाणार नाही, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. शिवाय, 'शिवभोजन थाळी' योजनेवरही आर्थिक संक्रांत ओढवली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, “आनंदाचा शिधा' योजनेसाठी टेंडर प्रक्रिया दोन ते तीन महिने आधीच पूर्ण करावी लागते. आता सणासुदीचा काल नजीक असून टेंडर काढणं शक्य नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा सध्या देऊ शकत नाही." या योजनेसाठी दरवर्षी ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यायची. पण सध्या तिजोरीवरचा भार प्रचंड वाढल्याने योजनेला स्थगिती देण्यात आली आहे
-----------------------