कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नांदणी येथील जिनसेन मठामध्ये असणारी लाडकी महादेवी उर्फ माधुरी हत्तीण गुजरात मधील वनतारा या वन्य जीव केंद्रात नेण्यात आली आहे . गेली 35 वर्षे महादेवीने केवळ नांदणी येथील भाविकांनाच लळा लावला आहे असे नाही तर मठामध्ये येणाऱ्या जिल्हा व राज्यातील हजारो भाविकांना सुद्धा तिने लळा लावला आहे.तिला न्यायालयाच्या आदेशानुसार वनताराला पाठवण्यात आले असले तरी तिचा विरह नांदणी मठातल्या भाविकांना असह्य झाला आहे.
वन्य जीवांवर प्रेम करणाऱ्या मुरगूड कर नागरिकांनाही या भावनिक घटने पासून अलिप्त राहता आले नाही. महादेवीला परत आणण्यासाठी जिल्हाभर जी चळवळ उभी करण्यात आली आहे तसेच पालकमंत्री , जिल्हाधिकारी व अन्य संबंधित विभागांना जी जी निवेदने देण्यात आली आहेत त्यांना मुरगूड करांचाही पाठिंबा आहे असे निवेदनात म्हटले आहे . बेंगलोर, केरळ या ठिकाणी एलिफन्ट रेस्क्यू सेंटर असतांना वनतारा या खाजगी केंद्राकडे दिल्यामुळे नागरिकांत मोठी नाराजी आहे.
सदरचे निवेदन डी वाय एस पी सुजित क्षीरसागर यांचेकडे देण्यात आले.
----------------