माधुरीला परत आणा मागणीसाठी कोल्हापुरात सर्व धर्मीयांचा विराट मोर्चा

Kolhapur news
By -

 

         



            कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


     गुजरातमधील वनतारा प्रकल्पाकडे सुपूर्द केलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील माधुरी हत्तीनीला परत स्वातीश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे परत द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व  सर्व धार्मियाचा आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.


कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. आज पहाटेपासूनच स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आत्मक्लेष पदयात्रा काढण्यात आली होती. नांदणीपासून ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या यात्रेत सर्वसामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच हे एक षड्यंत्र असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला आहे.


नांदणी जैन मठ तसेच हत्तीवर प्रेम करणारे विविध माध्यमातून चळवळ उभी करत आहेत. माधुरी हत्तीणीला परत मठात आणण्यासाठी राजकीय स्थानिक नेत्यांसह सर्व सामान्य जनतेने ही चळवळ सुरू केली आहे. 'एक दिवस महादेवी'साठी पहाटेपासून नांदणी मठापासून पदयात्रा काढण्यात आली होती. या मूक पदयात्रेत सर्व कोल्हापूरकर सहाभगी झाल्याचे दिसून आले. 


नांदणी येथील मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीचा सर्व धार्मियांचा विरोध पत्करून गुजरात येथील वनतारा प्रकल्पाने ताबा घेऊन पाच दिवसांपूर्वी तात्काळ वनतारा कडे घेऊन गेले. त्या दिवसापासून जिल्ह्यात विविध स्वरूपाची आंदोलने सुरु आहेत. कालच जयसिंगपूरात, रुकडी व माणगाव येथे मुकमोर्चा काढण्यात आला. कुरुंदवाडला मूक पदयात्रा काढण्यात आली, तर किनीत निषेध फेरी काढली.


जिल्हाधिकाऱ्यांची सुट्टीची झोप उडाली


जिल्हाधिकाऱ्यांना वाटलेही नसेल माधुरी हत्तीनीचे प्रकरण इतके चिघळेल असे. अगदी रविवारीच हत्तीनीला परत आणण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला. 


 गैरसोय होऊ नये यासाठी स्वाभिमानीचा रविवारी महामोर्चा

महामोर्चामध्ये जिल्हयातील सर्वधर्मीय मोठया संख्येने सहभागी होतील. चारी बाजूचे रस्ते बंद होतील. नागरिकांची गैरसोय होईल हा विचार करूनच रविवारी मोर्चा काढण्याचे नियोजन स्वाभिमानीने केले आणि याला भरघोस प्रतिसाद मिळाला. 


आज पहाटे पाच वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नांदणी येथून माधुरी हत्तीनीला परत आणा या मागणीसाठी पदयात्रा सुरु केली. या पदयात्रेत जिल्हा व कर्नाटकतील सर्वधर्मीय आपल्या गावापासून नागरिक सहभागी झाले होते. यामुळे या मोर्चाला विराट रूप प्राप्त झाले.जिल्हाधिकारी कार्यालयाचा आवार दुपारी तीन वाजताच तुडुंब भरला होता. वाहतूक अन्यत्र वाळविण्यात आली होती. 


नांदणी येथील माठातील माधुरी हत्तीनीला परत आणा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले.

                   -----------------

      कायदेशीर लढाई लढू - मुख्यमंत्री


 हत्तीला वनतारा Sanctuary मध्ये ठेवण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. समाजात यावर रोष असून, भाविकांना हत्ती Nandani Math मध्येच हवा आहे. या संदर्भात मंगळवारी बैठक लावण्यात आली असून, कायदेशीर पर्याय शोधले जातील. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपण नाही, त्यामुळे कायदेशीर तरतूदी तपासल्या जातील. ही मूळ केस Activist आणि व्यवस्थापक यांच्यातील होती. वनविभागाचा रोल केवळ अहवाल देण्यापुरता होता. 

       

  ------------------------------