कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आणखी १५ दिवसानंतर नंतर गणेशोत्सव सुरू होतोय.लहाना पासून ते वृद्धांपर्यंत ,आंधळ्या , पांगळ्या पासून ते बॉडीबिल्डर पर्यंत सगळेच या उत्सवात अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने भाग घेतात.आद्य आराध्य दैवत म्हणून पहिला मान गणपतीलाच असतो.
महाराष्ट्र शासनाने त्याला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे.सर्वच्या सर्व गणेश मंडळांना सांगितले आहे की हा उत्सव डॉल्बी आणि लेसर मुक्त झाला पाहिजे.त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करायला बंदी नाही. जिल्हाधिकारी,तहसीलदार आणि पोलिस प्रशासन यांनी सुद्धा तसेच सांगितले आहे.एवढे करूनही कांहीं ठिकाणी डॉल्बी व लेसर किरणांचा वापर केला जातो. डॉल्बी मुळे लहान मुलांच्या व वृद्धांच्या हृदयावर आघात होऊन कांहीं मृत्यूही घडून आले आहेत. त्यानी जर तक्रारी केल्या तर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे कायदें तज्ञांनी सांगितले.लेसर किरणांमुळे डोळ्यांच्या पडद्यावर अनिष्ट परिणाम होतो.
थोडक्यात डॉल्बी आणि लेसर हे दोन्ही मानवी आरोग्यास धोकादायक आहेत.तथापि कायद्याचे अज्ञान किंवा उत्सवाचा उन्माद यामुळे कांहीं मंडळे डॉल्बी व लेसर किरणांचा वापर करतात असे पोलिस प्रशासनाला आढळून आल्याने त्या मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मागील वर्षाच्या गुन्ह्यांच्या कोर्टाच्या तारखा अजूनही सुरू आहेत.मंडळाच्या प्रमुखांना नोटीसा निघतात .कोर्टाचा खर्च मंडळावर बसतो आणि नेते मंडळी मात्र मौज बघत रहातात अशी दयनीय परिस्थिती मंडळांच्या वाट्याला येते.
नागरिकांनीही अशा मंडळांना डॉल्बी व लेसर चा वापर करू नये असे आवाहन केले आहे.यात डॉल्बी व लेसर व्यावसायिक यांच्या पोटावर पाय येईल अशी शंका सुद्धा व्यक्त करण्यात आली.यावर पोलिसांनी सांगितले की हा कांहीं नवीन कायदा नाही.अपायकारक वाद्ये बंद करून ढोल, ताशा,हलगी ,यासारखी वाद्ये वापरू शकता.पुण्यासारख्या शहरात मुलांबरोबर मुली सुद्धा ढोल वाजवतात.त्यांना रंगीबेरंगी पोशाख व फेटे असतात.
गणेशोत्सवाचे पावित्र्य लक्षात घेऊन डॉल्बी व लेसर यांचा वापर करू नये असे आवाहन सर्व थरांतून करण्यात येत आहे.नागरिक सुद्धा यात सहभागी आहेत.
--------------------