शाळांना सुट्टी जाहीर

Kolhapur news
By -

 


मुंबई : मुंबईह महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजनाही शुक्रवारी सुट्टी मिळणार आहे. 18 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि 06 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, गुरुवारच्या शासन शुद्धीपत्रकानुसार यात बदल करण्यात आला आहे.


नवीन बदलांनुसार, आता गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी, नारळी पौर्णिमा (शुक्रवार, 08 ऑगस्ट, 2025) आणि ज्येष्ठगौरी विसर्जन (मंगळवार, 02 सप्टेंबर, 2025) या दोन दिवसांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


                ----------------------