रक्षाबंधनात लाल परीला प्रवाशांची १३७ कोटींची ओवाळणी.

Kolhapur news
By -

         


 मुंबई : रक्षाबंधनाचा भाऊ आणि बहिणीच्या जिव्हाळ्याचा सण.सणाला जोडून आलेल्या सलग सुट्या यामुळे प्रवाशांनी एस टी ला (लाल परी) तोबा गर्दी केली  आणि अवघ्या चार दिवसात तब्बल १३७.३७ कोटींचे उत्पन्न मिळवून दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

     दिनांक ११रोजी सर्वात जास्त ३९ कोटी चे उत्पन्न मिळाले. क्रमवार चार दिवसांचे उत्पन्न असे.शुक्रवार ३०.०६कोटी,शनिवार ३४.८६कोटी,रविवार ३३.३६ कोटी आणि सोमवारी तब्बल ३९.९कोटींचे उत्पन्न मिळाले.या चार दिवसात १कोटी९३लाख प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला.त्यात महिला प्रवाशांची संख्या ८८लाख होती.चालू आर्थिक वर्षातील हे सर्वात जास्त विक्रमी उत्पन्न असल्याचे मंत्रीमहोदयांनी सांगितले.


   त्यांनी सर्व प्रवासी बंधू भगिनींचे आणि घरचा सण सोडून अहोरात्र सेवा देणाऱ्या एस टी कर्मचारी यांचेही आभार मानले. 


परिवहनचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांस दिली.


                 ------------------