लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट.

Kolhapur news
By -

 




                 

                कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

      

  मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक संकुलास (साई)  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकतीच भेट दिली. त्यांच्या समवेत प्रांताधिकारी चौगुले व तहसीलदार अमरदीप वाकडे हे होते.संकुलाच्या महिला कुस्तीगीरांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीची त्यांनी प्रशंशा केली. 


    ग्रामीण भागातील या यशाची नोंद निश्चित घेण्यासारखी आहे असे ते म्हणाले.संकुलातील कुस्तीगिरांना  त्यांनी मार्गदर्शन केले आणि पुढील उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या. संकुलाच्या एकंदरीत कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व प्रशासकीय पातळीवर कांहीं मदत हवी असल्यास त्यासाठी जरूर संपर्क साधा असेही आश्वासन दिले.


यावेळी  माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर आणि नामदेवराव मेंडके ,राहुल शिंदे,दीपक शिंदे,दत्तात्रय मंडलिक आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासाहेब लवटे.

    

                    -----------------