नवरात्रोत्सवानिमित्त मुरगूड येथील अंबाबाई मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

Kolhapur news
By -

 

                    



          कोल्हापूर न्यूज नेटवर्क 

    


पश्चिम महाराष्ट्रातील करवीरनिवासिनी अंबाबाई नंतर दुसरे मंदीर म्हणून मुरगूड मधील श्री अंबाबाई मंदिर ओळखले जाते.शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर व्यवस्थापनामार्फत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी दिनांक २२ रोजी सकाळी अभिषेक व विधीवत घटस्थापना करुन या उत्सवास प्रारंभ झाला .मुरगूड शहराच्या मध्यवर्ती  अंबाबाई चे मंदिर आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने श्री अंबाबाई देवीची विविध रुपांमध्ये दरवर्षी प्रमाणे पुजा बांधली जाणार आहे.त्यामुळे भाविकांना दक्षिण काशी श्री  मुरगूड निवासिनी अंबाबाईचे दररोज विविध रुपात मुरगूड मध्ये दर्शन होणार आहे.


दररोज सकाळी नित्य पुजापाठ व सायंकाळी आठ वाजता महाआरती होईल. बुधवार दि २४ रोजी सायंकाळी सव्वासात वाजता माऊली सोंगी भजन साके यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.गुरुवार दिनांक २५ रोजी हर्षल नलवडे यांचा माईंड पॉवर शो हा कार्यक्रम,तर शुक्रवार दिनांक २६ रोजी अँकर वर्षा हेरे यांचा  होम मिनिस्टर कार्यक्रम ,शनिवार दिनांक २७ रोजी आकर्षक मिनी साउंड स्पर्धा आयोजित केले आहे.रविवार दिनांक २८ रोजी 9.30 वाजता हास्य सम्राट संभाजी यादव यांचा महाराष्ट्रात गाजलेला तुफान विनोद कार्यक्रम होईल. सोमवार दिनांक २९ रोजी माय बोली राधानगरी प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची साद मराठमोळ्या मनाला , याप्रमाणे  विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.


  उत्सव समितीचे अध्यक्ष पंकज नेसरिकर, उपाध्यक्ष अर्जुन दाभोळे यांनी ही दिली आहे.योजनातील सहकार्य व सहभाग याप्रमाणे.

 चिन्मय मगदूम, प्रवीण नेसरिकर ,शुभम वंडकर, सुशांत मगदूम ,ओंकार खंडागळे ,अथर्व लोखंडे, आशिष गुजर ,बबन बाबर, प्रज्वल पाटील, प्रतीक मोरबाळे ,हरीओम खराडे ,बादल रामाने,  पृथ्वीराज मेटकर, गणेश गोधडे ,विक्रम घाडगे, श्रेयश गोधडे, रोहन शेलार, आकाश हसबे, स्वप्निल अर्जुने, साईराज गुजर, रंजीत आरगडे, शिवाजी रावण, योगेश सारंग ,अमित बारड, दिग्विजय सुतार इत्यादी. 


 विशेष सहकार्य .

   भुते बंधू ,करण कुंभार गणेश नागरी पतसंस्था, मुरगूड विद्यालय मुरगूड, माऊली लाडू ,राजू चव्हाण ,मोहन कांबळे.


 दररोज आरतीला येणाऱ्या  महीलांसाठी एक साडी लकी ड्रॉ ने देण्यात येईल. उत्तराखंडातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिर देखावा  हे उत्सवाचे आकर्षण  आहे.


                  -------------------