अंबाबाई मंदिरात कुंकुमार्चन सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न.

Kolhapur news
By -

 

             


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


             मुरगूड येथील श्री अंबाबाई मंदिरात कुंकुमार्चन सोहळा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.  पौरोहित्य करतांना गुरुजींनी या सोहळ्याचे उत्सव महात्म्य कथन केले.अश्विन शुक्ल पक्षात सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात महिषासुर मर्दिनी दुर्गामातेच्या नऊ  अवतारांची आराधना करण्यात येते.नऊ दिवसांचे नऊ रंग देवीला आवडतात.देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कुंकुमार्चन सोहळ्याचे महत्व अधिक मानले जाते. यातून देवीचे आशिर्वाद मिळवणे व एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हा उद्देश असतो. कुंकू म्हणजे सौभाग्यलेणे होय. कुंकूवासोबत सोळा शृंगार सुद्धा आलेच.सोळा श्लोक असाही एक अर्थ अभिप्रेत आहे.या सोहळ्यात महिला भगिनी माता स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवीच्या समोर किंवा सानिध्यात बैठक करतात.विविध मंत्रोच्चार करून देवीला कुंकुम अर्पण करतात.त्यातही गायत्री मंत्र व महामृत्युंजय मंत्र यांना अधिक महत्व असते.


  गणपती अथर्वशीर्ष मंत्र सुद्धा आद्य पुजेत म्हंटला जातो. शेवटी देवीकडे वैभव ,संकटनाश , सकारात्मकता यासाठी  मनोभावे प्रार्थना केली जाते.अंबाबाई मंदिरातील या सोहळ्यासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. या पवित्र सोहळ्याचे आयोजन येथील महिला भगिनींच्या पुढाकाराने झाले होते.आयोजक महिला याप्रमाणे.

     सौ. सुजश्री संतोषकुमार वंडकर, सौ. पुष्पा पांडुरंग डेळेकर,सौ.माणिक तुकाराम वंडकर,सौ.जयश्री दत्तात्रय पौंडकर ,सौ.रुपाली प्रमोद वंडकर.

    


                    -----------------