मद्यपी कर्मचाऱ्यांना एस टी त थारा नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या सात कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा.

Kolhapur news
By -

 

             


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मद्यपी कर्मचाऱ्यांना एस टी मध्ये थारा  मिळणार नाही असे स्पष्ट आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.  या आदेशानुसार दिनांक २८ऑक्टोबर २०२५ रोजी एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाने अचानक राज्यभर मद्यपान विरोधी मोहीम सुरू केली.


    या मोहिमेत ७१९ चालक ५२४  वाहक आणि ४५८ यांत्रिकी कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली असता सात कर्मचारी दोषी आढळले आहेत. धुळे, नाशिक ,परभणी विभागात काम कारणारे हे कर्मचारी असून त्यांच्यात एक चालक सुद्धा आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासास सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल असे सांगून दोषी आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांचा अहवाल मुंबई  येथील मध्यवर्ती कार्यालयाला पाठविण्यात येईल व त्यानुसार  त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात  येईल असा इशारा सुद्धा मंत्री महोदयांनी दिला आहे.

  या पुढे नवीन बसेस मध्ये ब्रिथ ॲनालिसिस द्वारे कर्मचाऱ्यांची  अल्कोहोल चाचणी सुद्धा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कर्तव्य बजावताना मद्यपान करणे हा गंभीर गुन्हा आहे असे यापुढे मांनले जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.परिवहनचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी ही माहिती कोल्हापूर न्यूज नेटवर्कला  दिली.


                  -----------------------------