भैरवनाथ देवालय - कोडणी रस्त्यावर खड्डे

Kolhapur news
By -

 

                


                  

           कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


      भैरवनाथ देवालय ते कोडणी  रस्त्यावर भरपूर खड्डे पडल्यामुळे रस्ता खराब झाला आहे . त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे मजवून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. 


       हमिदवाडा कारखाना परिसरातील गावांमधून निपाणी , कागल व कोल्हापूरसाठी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी रस्ता चांगला झाल्यामुळे वाहतुकीचे प्रमाण ही वाढले आहे. पण या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याने वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 
सध्या  कारखान्यांचे गळित हंगाम सुरू असल्यामुळे ऊस वाहतुक ही रस्त्यावरून सुरू होणार असल्याने खड्ड्यांचे प्रमाण  वाढणारच आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॅचवर्क करून खड्डे मुजवण्याची गरज निर्माण झाली आहे. 


                -----------------------