कोल्हापूर न्यूज नेटवर्क
टीईटी परीक्षा रद्द करावी, संच मान्यतेचा 15 मार्च 2024 आदेश रद्द करावा, शिक्षण सेवक पद रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन पुणे विभागाचे शिक्षक आम.जयंत आसगावकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, सर्व मनपा, खाजगी उच्च माध्य,/माध्यमिक / प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आज मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते.
टीईटी परीक्षेत संदर्भात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल करणार असल्याचे सांगितले होते पण प्रत्यक्ष अजून याचिका दाखल झालेली नाही, १५ मार्च 2024 या संचमान्यतेच्या आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर शिक्षण सेवक पद रद्द करून शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांवर आज झालेल्या संघटना बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने आंदोलनात उतरावे असे आवाहन सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आम.जयंत आसगावकर, सभाध्यक्ष एस.डी.लाड,शिक्षक नेते दादा लाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई,सुधाकर निर्मळे, प्रसाद पाटील, विलास पिंगळे, बाबा पाटील सचिव आर.वाय. पाटील, भरत रसाळे,राजेंद्र कोरे,संतोष आयरे, प्रमोद तोंदकर, ज्योतीराम पाटील, मिलिंद तोडकर, संजय देमाण्णा,शिक्षक संघाचे रविकुमार पाटील, बाबासाहेब पाटील,जुनी पेन्शन संघटनेचे मंगेश धनवडे , शिक्षक परिषदेचे उदय पाटील,पदवीधर शिक्षक संघटनेचे सुकुमार पाटील,शिक्षक संघाचे बबन केकरे, माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक, शिक्षक भरतीचे गजानन कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे डी. वाय. कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, सर्व मनपा, खाजगी उच्च माध्य,/माध्यमिक / प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी-------------------

