कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखलीचे आदर्श युवा पशुपालक अरविंद यशवंत पाटील यांना नुकताच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल चिखलीकरांना याचा सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन बिद्रीचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले यांनी केले.
अरविंद पाटील यांना राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल चिखली ग्रामस्थांनी त्यांचा प्रवीणदादांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला , यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद,महंमद मुल्लानी,राजराम बेनाडे,अनिल गुरव,राजाराम पाटील,ओमाजी कांबळे सर,उत्तम पाटील,दत्तात्रय बेनाडे, बट्टू कांबळे फौजी, आनंदा पोवार, पांडुरंग गळतगे,सुशांत पोवार,महेश गळतगे,मारुती संकपाळ टेलर,रघुनाथ गायकवाड,भारत साठे,संजय चिखलीकर,अनिल डवरी,विवेक गवळी,संजय बेनाडे,सचिन सूर्यवंशी,मुकुंद गळतगे, बाळासो खोत यांच्यासह अरविंद पाटील यांचे वडील यशवंत पाटील व बंधू अमर पाटील उपस्थित होते.
------------------------------------

