कोल्हापूर न्यूज नेटवर्क
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने गुरुवार दि . 6 नोव्हेंबर रोजी शिक्षण परिषद आयोजित केली असून यामध्ये शिक्षण जागर पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली .
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्षी 5 ऑक्टोबर या जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण परिषद आयोजित करून यामध्ये शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्यां शिक्षकांना "शिक्षण जागर " पुरस्काराचे वितरण केले जाते . चालू वर्षी शिक्षण परिषदेमध्ये "टीईटी सक्ती :अर्थ आणि अनर्थ " या विषयावर चर्चा केली जाणार असून या शिक्षण परिषदेचे उद्घाटन विधान परिषदेचे गटनेते व माजी गृह आणि ग्रामविकास राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी .पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे .या शिक्षण परिषदेमध्ये टीईटी सक्ती -अर्थ आणि अनर्थ या विषयावर मान्यवर वक्ते म्हणून शिक्षक आम .प्रा. जयंत असगावकर कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . मीना शेंडकर , प्राचार्य प्रभाकर हेरवाडे व अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षा महासंघाचे महासचिव सुधाकर सावंत हे आपले विचार मांडणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे आहेत .
हा कार्यक्रम गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता कै . राम गणेश गडकरी हॉल पेटाळा खरी कार्नर कोल्हापूर येथे होत असून संघटनेचे पदाधिकारी शिवाजी भोसले, महादेव डावरे , कुमार पाटील, सविता गिरी , चारुलता पाटील 'मच्छिंद्र नाळे , आप्पासाहेब वागरे हे ही परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत .
सध्या देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्वलंत प्रश्न म्हणून उभा राहिलेल्या टीईटी सक्ती या विषयावर चर्चा होणार असल्याने शिक्षणप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही परिषद यशस्वी करावी .असे आवाहन राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले आहे .
_ _ _ _ _

