मुंबई : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेवरून एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ला महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.फक्त एका आठवड्यात महाराष्ट्राच्या विविध भागातून गेल्या आठवड्यात ३०८ तक्रार वजा सूचना महामंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत.
या सूचनांच्या आधारे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सकारात्मक सुधारणा करण्यास वाव मिळत आहे.त्यांच्या मानसिकतेसुद्धा उत्साहवर्धक बदल झाल्याचे दिसत आहे.
हेल्पलाइन नंबर हा **तक्रार पेटी** न रहाता विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे **विश्वास केंद्र** बनेल असे विद्यार्थ्यांच्या पालकांनाही वाटत आहे.
साधारणपणे खालील सूचनांचा समावेश हा हेल्पलाइन वर होता.
१.बस थांब्यावर न थांबणे.
२.लांबपल्ल्याच्या बस मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नसणे.
३. पास धारकांना प्रवेश नसणे.
४.बस वेळेवर न येणे.त्यामुळे होणारे शैक्षणिक नुकसान.
इत्यादी
एस टी बद्दल विद्यार्थीवर्गात उत्साहाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात हा हेल्पलाईन क्रमांक निश्चित परिणामकारक ठरला असल्याचे परिवहनचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले.
-------------------------



